बीड, दि. 24 सप्टेंबर : आज सलग दुसर्या दिवशी कोरोनामुक्त होणार्या रूग्णांचा आकडा तीनशे पार जाणार आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 342 रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतणार आहेत. यामध्ये बीड 41, आष्टी 17, पाटोदा 23, शिरूर 56, गेवराई 39, माजलगाव 13, वडवणी 35, धारूर 33, केज 24, अंबाजोगाई 34 आणि परळीतील 27 रूग्णांचा समावेश आहे, जिल्ह्यात आतापर्यंत 8805 रूग्ण बाधित सापडले आहेत. 248 जणांचा मृत्यू तर 5959 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत, तर सध्या 2598 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
सलग दुसर्या दिवशी कोरोनामुक्त होणार्या रूग्णांचा आकडा जाणार तीनशे पार, आज जिल्हाभरातील 342 रूग्ण बरे होवून घरी परतणार
