Site icon लोकाशा-बंब न्यूज

खरीप पिक कर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव दाखल करा, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुन्हा एखदा जिल्हाधिकार्‍यांनी केले आवाहन


बीड, दि. 23 : ज्यांनी एकदाही पीक कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकर्‍यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्जाच्या मागणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, जे शेतकरी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकर्‍यांचे अर्ज बँकांनी स्विकारावेत, जे बँक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापकाविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, तसेच ज्या शेतकर्‍यांचे अर्ज संबंधित बँकेकडे प्रलंबित आहेत, अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी, यात हयगय करणार्‍या बँक व्यवस्थापकावर नियमानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल, यांची गंभीर नोंद व्यवस्थापकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

Exit mobile version