पुणे, 23 सप्टेंबर : भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युमार्फत (serum institute of india) ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं (corona vaccine) क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ही लस इंजेक्शनमार्फत दिली जाते. मात्र आता भारतात फक्त इंजेक्शनमार्फतच नाही तर नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने Nasal corona vaccince चं उत्पादन सुरू केलं आहे.
अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत.
सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
कोडाजेन्सिक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लशीचं भारतात उत्पादनाला करायला सीरम इन्स्टिट्युटला परवानगी मिळाली आहे. भारताच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या (DBT – India’s Department of Biotechnology) रिव्ह्यु कमिटी ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशनने (RCGM – Review Committee on Genetic Manipulation) ही परवानगी दिली आहे.
हे Corona vaccine घेण्यासाठी नाही इंजेक्शनची गरज; आता आली वेदनाविरहित कोरोना लस
या लशीचं प्री क्लिनिक ट्रायल म्हणजेच प्राण्यांवरील चाचणी पूर्ण झाली आहे. ज्याचा परिणाम सकारात्मक आला आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे, असं कंपनीने सांगितलं. आता मानवी चाचणी म्हणजेच क्लिनिक चाचण्या सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीला यूकेमध्ये सुरुवात केली जाणार आहे. 2020 च्या अखेर हे ट्रायल सुरू होईल, अशी माहिती लस तयार करणाऱ्या कंपनीने दिली आहे.
ऑस्ट्रेलियातही तयार करण्यात मशीनद्वारे दिली जाणारी कोरोना लस
ऑस्ट्रेलियातही शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी 150 लोकांनी त्यांची नावं पाठवली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल. हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते.
हे ‘ कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही’; WHO च्या प्रमुखांचा धक्कादायक खुलासा
डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. मॅनसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. एअर जेट सिस्टममुळे वेदना होतच नाही असे नाही. मात्र यामुळे सुई लावल्यानंतर त्वचेवर होणारी इजा कमी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने ही लस विकसित करण्यासाठी 30 लाख डॉलर्सचा निधी जाहीर केला.
लशीच्या वितरणासाठी WHO ने तयार केली यंत्रणा
जागतिक आरोग्य संघटना कोरोना लस विकसित करण्यासाठी जोडलेल्या जागतिक समूह आणि सीइपीआयसह समन्वय करीत आहे. भविष्यात देशांमध्ये लशीचं समान वितरण करण्यासाठी कोवॅक्स नावाची एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी सांगितले की, कोवॅक्स ही लशीच्या विकासाला सक्षम बनवते आणि विविध देशांच्या नागरिकांपर्यंत प्रभावी लस पोहोचली जावे याची यात्री करता येते