पिंपळवंडी, दि.20 सप्टेंबर : ऊस तोडणीसाठी इसार म्हणून दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मागणीवरून पिंपळवंडी (ता.पाटोदा) येथील युवक मारुती (बाळु) निवृती पवार यांच्या डोक्यात दगड घालून खून झल्यच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
या विषयी माहिती अशी की गंगाधर निवृती पवार यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले की माझा भाऊ मारुती निवृती पवार (वय 40) यास मुकादम दादा शहादेव धनवडे (वय 36) हा दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर मारुती हा दि.19 सप्टेंबर 2020 पर्यंत घरी आला नाही दरम्यान त्याचा आसपास परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. दि.19 रोजी व्हॉट्सवर फोटो दिसले की, डोंगरकिन्ही परिसरात कुणीतरी दगड डोक्यात मारून खून केलेले एक पुरुष जातीचे प्रेत सापडले त्याप्रमाणे प्रेत पाहिल्यानंतर ते प्रेत मारुतीचेच असल्याची खात्री पटली. त्यावरून मारुती यास दादा शहादेव धनवडे हा ऊसतोडणीसाठी ईसार म्हणून दिलेले पाच हजार रुपये सतत मागत असायचा. त्याच कारणावरून मारुती याला दादा शहादेव धनवडे याने 17 सप्टेंबर 2020 रोजी सोबत घेऊन जाऊन त्यास कशाने तरी डोक्यात मारून त्याचा जीव घेऊन त्याचा खून केला आहे अशी फिर्याद दिली. अमळनेर पोलिस ठाण्यात गु. र. नं.222/2020कलम 302 भा. द. वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दादा शहादेव धनवडे यास पाच दिवसांची पोलिस कठडी मिळाली आहे. पोलिस उपनिरिक्षक अमन सिरसाठ यांचेकडे तपास देण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे पो.उ.नी सिरसाठ हे पो. अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पो. अ कवाडे डी. वाय.एस.पी लगारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून गुन्ह्यातील आरोपी दादा शहादेव धनवडे यास दि.19 रोजी तत्काळ अटक केली.यासाठी पो. ह काकडे पो. ना आघव पो.का. खोले, पवळ , भालसिंग, गुंडाले आदी तपास कार्यात सहकार्य करीत आहेत.