Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठा आरक्षण; मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी समाजाचे धरणे

बीड, दि.17 (लोकाशा न्युज) ः मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगिती निर्णणावर पुर्नःयाचिका दाखल करावी, सरकारने दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेश उठविण्यासाठी पाठपुरवा करावा यासह आरक्षण संदर्भातील इतर मागण्यांसाठी मराठा समाजबांधवांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तीव्र निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांसह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान, उद्या शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सायंकाळी मराठा समाजबांधव आप-आपल्या घरी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

ना. मुंडेंनी घेतली आंदोलकांची भेट
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांची पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी भेट घेतली. सरकार मराठा समाजासोबत असून आरक्षण मिळावे यासाठी सरकार संपूर्ण ताकदीने लढले असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या आंदोलकांकडून ऐकून घेतल्या.

Exit mobile version