Site icon लोकाशा-बंब न्यूज

लडाखमध्ये भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात– राजनाथ सिंह

लडाख, दि. १५ : पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. लडाखमधील भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने POK मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.
सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Exit mobile version