Site icon लोकाशा-बंब न्यूज

गाव समृद्ध करण्यासाठी नरेगा योजनेचा उपयोग करा -जिल्हाधिकारी रेखावार


धारूर : गाव समृद्ध करण्यासाठी नरेगा योजनेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, गाव कायमस्वरूपी समृद्ध होण्याचे स्वप्न सर्वच गावकर्‍यांनी पहायला हवे. गावकर्‍यांनी कामाची यादी करून सर्व कामे करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनमी केले.
धारूर येथील तहसील कार्यालयात रविवारी पाणी फाऊंडेशन आयोजित समृद्ध गाव स्पर्धा 2020-21 प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गावाचा विकास करायचा असेल तर सर्व गावकर्‍यांनी मिळून करावा लागेल. गाव कायमस्वरूपी समृद्ध होण्याचे स्वप्न सर्वांनी पहायला हवे. गावाच्या विकासासाठी नरेगा योजनेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला तहसीलदार वंदना शिडोळकर, गटशिक्षणाधिकारी सोपान अकेले, रामेश्‍वर स्वामी, शरद शिनगारे, दादा घोडके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. धारूर तालुक्यातील 23 गावे समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला गावातील नागरिक, ग्रामसेवक, तलाठी, पत्रकार यांची उपस्थिती होती.

Exit mobile version