मुंबई दि. 12 सप्टेंबर :- निवृत्त नौदल अधिकाऱ्याला फक्त एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार म्हणजे गुंडाराज आहे. उद्धवजी गुंडाराज आवरा असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी गुंडाराज आवरा, एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला निव्वळ एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली आहे हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे असं म्हटलं आहे. घडलेला हा सगळा प्रकार अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे गुंडाराज थांबवा असं म्हटलं आहे.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, फडणवीस म्हणतात ‘गुंडाराज थांबवा’
