Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाटोद्याचा कुस्तीपटू राहूल आवारेला कोरोनाची लागण

बीड – जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कास्यपदक विजेता राहूल आवारे यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय शिबीरासाठी तो सोहनीपथ येथी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात दाखल झाला होता. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विनेश फोगाट, दीपक पुनिया, नवीन आणि कृष्णन यांच्यानंतर राहूलला कोरोनाची लागण झाली आहे. 
राहूल आवारेने नॉन ऑलम्पिक ६१ किलो वजनी गटात गतवर्षी कास्यपदक जिंकून बीड जिल्ह्याची मान उंचावली होती. जागतिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिबीरात सहभागी होण्यासाठी तो सोहनीपथ येथे गेला होता. त्याठिकाणी दाखल झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला साईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत, असे क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. साई केंद्रात आल्यापासून राहूल क्वारंटाईन होता आणि तो कोणाच्याही संपर्कात आलेला नाही. याआधी विनेश फोगाट, दीपक पुनिया, नवीन आणि कृष्णन यांनाही कोरोनाची लागण झाली असून राहूल हा कोरोनाची लागण होणारा पाचवा कुस्तीपटू आहे. 

Exit mobile version