Site icon लोकाशा-बंब न्यूज

एलसीबीचा जुगार अड्ड्यावर छापा, १३ जणांना पकडले, २,४९,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त


बीड: मा. पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांनी स्था.गु.शा. बीड यांच्या विशेष पथकाला अवैध धंद्याची माहिती काढून दर्जेदार केस काढून अवैद्य धंद्याचे उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्याने विशेष पथकाचे स.पो.नि आनंद कांगुणे व पथकातील कर्मचारी हे दिनांक ०५/०९/२०२० रोजी ३:०० च्या सुमारास पोलिस स्टेशन अंमळनेर हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करणेकामी गस्त करत असताना स.पो.नि. कांगुने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे अंमळनेर शिवारात चंद्रवाडी रोडचे पश्चिमेस जनार्दन पवार यांच्या शेतात झाडाखाली मोकळ्या जागेत इसम नामे गोविंद श्रीपती गाडे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड हा स्वतःच्या फायद्यासाठी काही इसमांना एकत्र जमवून विनापरवाना बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार पैशांवर हार-जीत चा खेळत व खेळवत आहे. नमूद बातमी मिळताच सपोनि कांगुणे व सोबत पोलीस कर्मचारी यांनी नमूद बातमी च्या ठिकाणी ०३:४५ वाजता अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी जुगार खेळणारे काही इसम पोलीस पथकांची चाहूल लागल्याने पळून गेले व जागीच तेरा इसम नावाचा हार-जीत जुगार खेळत खेळत असताना मिळून आले. नमूद इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) दिनकर साहेबराव नागरगोजे वय ५८ वर्ष राहणार सावरगाव ता.पाटोदा जि.बीड, २) दिलीप दामोदर गरजे वय ४५ वर्ष राहणार डोईठाण ता.आष्टी जि. बीड, ३) पप्पू विठ्ठल राख वय ४५ वर्ष राहणार सावरगाव ता.पाटोदा जि.बीड, ४) शिवाजी भानुदास पवार वय ५६ वर्षे राहणार पिंपळवंडी ता. पाटोदा जि. बीड, ५) सदाशिव भगवान मोठे वय ३५ वर्षे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि.बीड, ६) नारायण उत्तमराव नागरगोजे वय ४५ वर्षे राहणार सावरगाव ता. पाटोदा जि.बीड, ७) ज्ञानोबा साहेबराव नागरगोजे वय ४४ वर्षे राहणार सावरगाव ता. पाटोदा जि. बीड, ८) अशोक सुबराव पवार वय ३५ वर्षे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड, ९) सोमनाथ धोंडीबा पवार वय ३४ वर्षे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि.बीड, १०) राजाभाऊ अमृत लोकरे वय ३५ वर्षे राहणार अंमळनेर ता.पाटोदा जि. बीड, ११) योगेश सर्जेराव पोकळे वय ३६ वर्षे राहणार अमळनेर ता. पाटोदा जि.बीड, १२) कर्ण प्रदीप बेद्रे वय ३६ वर्षे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड, १३) अरबाज अहमद बागवान वय २४ वर्षे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि.बीड असे सांगितले. नमूद इसमांच्या ताब्यात तिरट जुगाराचे पत्ते, रोख रक्कम ८१,४७०/- रुपये, किमती रुपये ७८०००/- चे बारा मोबाईल फोन, किंमत रुपये ९०,०००/- च्या तीन मोटारसायकल असा एकूण २,४९,४७० रुपयांचा माल मिळून आला नमूद जुगार खेळणाऱ्या ताब्यात घेतलेल्या इसमांकडे नमूद क्लबचा चालक कोण आहे? याबाबत विचारणा केली असता गोविंद श्रीपती गाडे राहणार अंमळनेर ता. पाटोदा जि.बीड हा नमूद क्लब चालक असून तो पोलिस पथकास पाहून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. वर नमूद जुगार खेळणाऱ्या तेरा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तसेच पळून गेलेला क्लब चालत गोविंद श्रीपती गाडे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाणे येथे गुरनं.२०८/२०२० कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए. पोद्दार, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्री. विजय कबाडे, पो.नि.श्री. भारत राऊत, स्था.गु.शा. बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि आनंद कांगुणे, पो.ना झुंबर गर्जे, पो.ना. संतोष हांगे, पो.कॉ. गोविंद काळे, पो. कॉ. अन्वर शेख, पो.ना. चालक गहिनीनाथ गर्जे यांनी केली आहे.

Exit mobile version