Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी शहरात गुटखा माफियांचा नंगानाच सुरूच ; पोलिसांनी पकडला दीड लाखांचा गुटखा



परळी, दि. 5:- राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढु नये यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आणली आहे. त्यातल्या त्यात गुटखा विक्री गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यात लॉक डाऊन आणि संचारबंदी असतानाही परळी शहरात गुटखा माफियांकडून मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री तह्यात सुरू होती आजही आहे. असेच परळी शहरांमध्ये कार मधून गुटखा आणीत असतांना संभाजीनगर पोलिसांनी गुटखा आणि कार सह पाच लाखांचा ऐवज जप्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरांमध्ये गेली अनेक महिन्यांपासून गुटखा माफियांचा गुटखाराज सर्रास सुरू आहे. राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढु नये यासाठी गुटखासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कडकडीत प्रतिबंध आणले. राज्य सरकारने कितीही कडकडीत प्रतिबंध आणले असले तरीही परळी शहरांमध्ये सर्रास गुटखा मोठ्या प्रमाणावर अणला जाऊन विक्री होत होता आणि होत आहे. इतकेच नाही तर मोठ्या प्रमाणात ट्रकने आणलेला गुटखा खाली करण्यासाठी शहरात मोठ मोठे गोडाऊन असून गुटखा भरून आणलेली ट्रक सरळ गोडाऊनमध्ये जाऊन खाली करण्याची सोय आहे. पोलीस प्रशासन शहरांमध्ये आणलेला दीड-दोन लाखांचा गुटखा पकडतात मात्र त्यांना आजतागायत गुटख्याच्या गोडाऊनचा थांगपत्ता कसा लागला नाही असा एक गंभीर प्रश्न शहरांमध्ये चर्चिला जात आहे. गुरुवारच्या मध्यरात्री संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके हे आपल्या सहकार्‍यांसह रात्रीच्या गस्तीवर असताना परळी – गंगाखेड रोड वरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक कार संशयित रित्या शहरांमध्ये येत असल्याचं त्यांना दिसलं चांद मेंडके यांनी सदरची कार अडवली आणि तपासणी केली असता कार मध्ये गुटख्याच्या जवळपास सोळा बॅग दीड लाख किंमतीच्या आढळून आल्या. कार चालकाची चौकशी केली असता कार चालकाचे नाव सचिन गुट्टे असल्याचे समजले. संभाजीनगर पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा आणि कार असे मिळून पाच लाखांचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला आणि आरोपी सचिन गुट्टे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संभाजीनगर पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा पकडून आरोपीवर कारवाई केली असली तरीही पोलीस ह्या गुटख्याच्या मागे गुटखा माफिया कोण आहे हे शोधून त्याच्यावर कारवाई करण्यास का धजावत नाहीत असा कधीही न सुटणारा प्रश्न परळीकरांसमोर पडला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये परळी शहरात चार ते पाच मोठे गुटखा माफिया आहेत जेकी मोठमोठ्या ट्रकमधून शहरात गुटखा आणतात आणि सर्रास विक्री करतात. पोलीस प्रशासन माहित असलेल्या मोठ्या गुटखा माफियांवर केव्हा मोठी कारवाई करतात आणि राज्य सरकारचा गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी परळी शहरात सफल होईल याकडे अख्ख्या परळी शहराचे नव्हे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

अवैध धंदे बंद करा
परळी शहरात दोन्हीही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा, मटका, हातभट्टी दारू, जुगार अड्डे आधी फोफावले असून अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. हे अवैध धंदे त्वरित बंद करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, ज्येष्ठ नेते एन के सरवदे, युवाध्यक्ष साहेबराव लोंढे, परमेश्वर लांडगे, गफारखान, धम्मानंद क्षीरसागर आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version