बीड,दि.3(लोकाशंा न्यूज): जगभर कोरोनाचे संकट असताना त्या विरोधात लढण्याची देखील मोठी शर्थ शासन प्रशासन कडून केली जात आहे. आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी कोविड वार्डातील रुग्णांना भेट दिली व त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी रुग्ण, डॉक्टर कर्मचारी यांच्याशी सवांद साधला. जिल्हा रुग्णातील कोव्हीड सेंटरमधील सर्व आधिकरी -कर्मचार्यांसह जेवणाचीही स्तुती केली.
आयुक्त सुनिल केंद्रेकर, डॉ. अशोक थोरात व डॉ. सुखदेव राठोड यांनी कोव्हीड वार्डातील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वार्ड अंतर्गत स्वच्छता गृहाची पाहणी केली. त्यांचबरोबर रुग्णांकडून त्यांचे प्रश्न जाणून घेत सर्व सोयी सुविधांबाबत विचारपुस केली. जिल्हा आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. डॉक्टर पासून ते वार्ड बॉय पर्यंत सर्वांचे अभिनंदन केले. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, आमचे डॉक्टर व यंत्रणा पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगत कोव्हीड सेंटरमधील जेवणाबाबत रुग्णांना विचारणा केली असता रुग्णांकडून उत्तम दर्जेचे जेवण येत असल्याचे सांगण्यात आले.
1000 ऑक्सिजन बेड तयार करण्याच्या सुचना
भविष्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये 1000 ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यासंदर्भात सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची उपस्थिती होती.