Site icon लोकाशा-बंब न्यूज

सामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल 3 महिन्यांत 11 रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचे दर


मुंबई दि. 02 :- सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL)ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. मात्र, पेट्रोलच्या दरात 15 दिवसांत प्रतिलिटर 1.6 रुपयांनी वाढ झाली आहे आणि तीन महिन्यांत सुमारे 11 रुपये प्रतिलिटर एवढी पेट्रोलची किंमत वाढली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 82.08 रुपये तर मुंबईत 88.73 रुपये प्रतिलिटर झाली. ऑगस्टमध्ये दिल्लीत डिझेलचे दर 73.56 रुपये आणि मुंबईत 80.11 रुपये होते. करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इंधनाचे दर वाढले आहेत.

Exit mobile version