बीड दि. 31 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला असला तरी यातून मुक्त होणार्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे, जिल्ह्याची कोरोनामुक्तीची टक्केवारी 72.3 एवढी आहे, तर मायताचे प्रमाण 2.7 टक्के आहे, कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आहे, आज जिल्ह्याभरातून 80 रुग्ण बरे होऊन घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 27, आष्टी 3, शिरूर 5, गेवराई 6, माजलगाव 13, वडवणी 1, धारूर 5, केज 1, अंबाजोगाई 17, परळीतील 2 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4561 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, 3299 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 125 मयत तर 1137 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज जिल्ह्यातून 80 कोरोनामुक्त
