Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुन्हा एका स्वारातीच्या हंगामी कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू

अंबाजोगाई,दि.25(लोकाशा न्यूज): अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना बाधित वर्ग चार हंगामी बदली कर्मचारी यांचा नऊ दिवस सुरू असलेल्या उपचारा दरम्यान अखेर रात्री मृत्यू झाला आहे.
काळवटी तांडा येथील रहिवासी असलेले सुभाष चतुरा जाधव (वय 40 वर्ष) मागील पंचेविस वर्षापासून येथील स्वारातीमध्ये हंगामी बदली कर्मचारी म्हणून कार्यरत होते जुलै महिन्यात रोटेशन नुसार त्यांनी कोरोना कक्षात आठ ते दहा दिवस त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. त्यानंतर त्यांना कोरटाइन कालावधी देण्यात आला होता. मात्र ते कोरनटाइन कालावधी समाप्त झाल्यावर घरगूती कामामुळे व प्रकृती खराब असल्याने कामात रुजू झाले नव्हते नंतर त्यांनी प्रकृती स्थिर होत नसल्याने स्वारातीमध्ये धाव घेऊन रुटीन चेकअप करून घेतला असता त्यानी कोरोना कक्षात काम केल्यामुळे येथील डॉक्टरांनी त्यांचा स्वाब तपासणीसाठी प्रयोगशाळा येथे पाठवून त्यांना दि.17 ऑगस्ट रोजी उपचारासाठी कोरोना कक्षात दाखल करून घेतले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाला होता. नऊ दिवसाच्या उपचारा दरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला आहे. चाळीस वर्षीय तरुण कर्मचार्‍याला येथील प्रशासनाने नऊ दिवस उपचार करून सुध्दा कोरणातून वाचवता आले नाही.
कोरोना काळात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आतापर्यंत तीन बदली कर्मचारी कोरोनामुळे दगावले आहेत. स्वारातीच्या वर्ग चारची सर्वकाही जबाबदारी हंगामी बदली कर्मचारी यांच्यावर अवलंबून आहे. हे बदली कर्मचारी तेथे जर नसले तर स्वारातीची सर्व व्यवस्था कोलमडून पडेल शासनाने आजपर्यंत आम्ही कंत्राटी पद्धतीने वर्ग चार कर्मचारी उपलब्ध करून व्यवस्था सुरळीत चालू ठेऊ असा दम
देत बदली कर्मचारी यांना आजपर्यंत जाचक अटी टाकून व पंचेविस ते तीस वर्षे काम करून सुध्दा कामावर कायमस्वरूपी केले नाही. वर्ग चारच्या जागा येथे कमी पडत असल्याने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचा प्रयोग सुध्दा केला. मात्र अनेक कंत्राटी कामगार दोन ते तीन दिवस काम करून काम सोडून निघून गेले आहेत. याच बदलू कर्मचारी यांच्या वर स्वारातीची वर्ग चार ची सर्व जबाबदारी असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी जातीने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावणे आता गरजेचे झाले आहे. नसता अजून काही घटना घडल्यास याला स्वाराती प्रशासन जबाबदार राहणार नसून राज्य सरकार मात्र जबाबदार राहील असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही.

Exit mobile version