Site icon लोकाशा-बंब न्यूज

नांदूरघाटमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पिसेगाव सेंटरवरून पळाला


नांदुर घाट,
कोरोना हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्व परी उपाययोजना करत आहे परंतु ही उपाययोजना व सुरक्षा खरंच खाली आमलात आणली जाते का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नांदुर घाट मधील एका 31 वर्षीय युवकाचा स्वॅप दिनांक 25 रोजी घेण्यात आला तो पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिनांक 26 रोजी आला त्याला पिसेगाव येथील सेंटरवर पाठवण्यात आले परंतु तीन तासात तो त्या ठिकाणाहून दिनांक 26 रोजी पळून गेला यामुळे त्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेचे खरे वास्तव समोर आले.
सविस्तर वृत्त असे की रवींद्र बापू शिंदे ( पारधी ) वय 31 वर्ष राहणार नांदूर घाट हा दोन गुन्ह्यात आरोपी होता व फरार होता त्याला दिनांक 25 रोजी एलसीबी च्या पथकातील पीएसआय थेकीलवाले पोलीस श्रीमंत उबाळे जगताप नवले हडके यांनी सापळा रचून रवींद्र शिंदे याला अटक केली व केज पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन केले दिनांक 26 रोजी कोर्टापुढे आरोपी हजर करण्यात आला त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला परंतु दिनांक 25 रोजी जेव्हा एलसीबी ने अटक करून केज पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केले तेव्हा त्याचा स्वॅप घेण्यात आला त्याला दिनांक 26 रोजी कोर्टात हजर करेपर्यंत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याला जामीन देण्यात आली व त्याची रवानगी पिसेगाव येथील कोव्हीड सेंटरमध्ये करण्यात आली त्या ठिकाणी तो त्याच रात्री दहा ते अकरा च्या दरम्यान त्या ठिकाणाहून पळून गेला व आज सकाळी गावातील काही लोकांनी त्याला पारधी वस्तीवर पाहिल त्याचा जामीन झाल्यामुळे पोलिसांनी सुद्धा तिकडे जाणे टाळले किंवा त्याचा शोध घेण्याचे टाळले परंतु त्याच्यामुळे आणखी किती पेशंट होतील हे सांगता येत नाही प्रशासन एखाद्या ठिकाणी पेशंट निघाला तर त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करून तो पूर्ण एरिया सील केला जातो या ठिकाणी तर सेंटर मधूनच माणूस निघून येतो व बिनधास्त हिंडतो मग ही साखळी तुटायची कशी हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित नांदुरघाट चौकीचे जमादार मुकुंद ढाकणे शिवाजी सानप यांनी पारधी पिढी वर जाऊन त्याठिकाणी बजावले आहे या ठिकाणी त्याला येऊ देऊ नका त्याचा संपर्क होऊ देऊ नका कोणाला असे ठणकावून सांगितले आहे परंतु सेंटर’मध्ये कोणतीच सुरक्षा व्यवस्था आहे की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे पॉझिटिव पेशंट असे निघून जात असतील तर गावे बंद करून तसेच लॉक डाऊन करून उपयोग काय हादेखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे हा पेशंट त्या ठिकाणाहून पळून जातो तो कसा गेला याची चौकशी व्हायला पाहिजे व अशा बेजबाबदार व्यक्तीवर कारवाई व्हायला पाहिजे व जे प्रशासनाचे नियम पेशंट पाळत नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे

Exit mobile version