Site icon लोकाशा-बंब न्यूज

पावडर कोटिंगच्या दुकानात भीषण स्फोट;एकचा मृत्यू

बीड, दि.25(लोकाशा न्यूज):- बीडमध्ये पावडर कोटिंगच्या दुकानात भीषण स्फोट झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

संतोष गिराम (वय ३०, रा.गिरामनगर बीड) या तरूणाचे पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ खिडक्या स्लायडींगचे दुकान आहे. दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान गॅस गळती होवून त्याचा स्फोट झाला. यात संतोष गिराम हा तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाला. तर काम करणारे अन्य तिघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर करपरा नदीचा परिसर हादरला होता. स्फोट होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Exit mobile version