बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढली असली तरी यातून बरे होणार्यांची संख्याही मोठी आहे. त्यानुसारच आज जिल्ह्यातील 64 रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतणार आहेत. यामध्ये बीड 17, आष्टी 2, पाटोदा 1, शिरूर 1, गेवराई आठ, माजलगाव 9, वडवणी 2, धारूर 4, केज 12, अंबाजोगाई 4, आणि परळी चार रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3782 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यापैकी 1937 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. 84 जणांचा मृत्यू तर सध्या 1761 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज 64 रूग्ण कोरोनामुक्त होणार
