Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘त्या’ सहा शहरातील ‘लॉक’ टप्प्या-टप्प्याने उघडणार



बीड ः कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव आणि आष्टी या शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहेे, खर्‍या अर्थाने ही मुदत रात्री बारा वाजता संपते, मात्र मागच्या दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी या सहा शहरांमध्ये काही दुकानांना सुट दिलेली आहे. त्याअनुषंगानेच आता या शहरातील लॉकडाऊन/दुकाने टप्प्या-टप्प्याने उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. एकाच वेळी मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. यासंदर्भातच शनिवारी जिल्हाधिकारी एखादा आदेश काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊन असतानाही सणाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा प्रशासनाने त्या सहा शहरात गुरूवारी लॉकडाऊनमधून काही दुकानांना सुट दिलेली आहे. त्यानुसार बीड, आष्टी, परळी, केज, माजलगाव आणि अंबाजोगाईत किराणा दुकाने, फळेभाजीपाला, दुध, मेडिकल, गणेश मुर्ती विक्रीचे दुकाने, पुजेचे साहित्य, हारफुलांंची दुकाने आदी घाऊक व किरकोळ विक्रीचे दुकाने सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सणासाठी ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी मिठाई, हॉटेल, रेस्टॉरंट, सुशोभीकरण साहित्य विक्री व इतर प्रकारचे दुकाने उघडण्यास बंदी घातलेली आहे. या विषयीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या सहाही शहरातील परवानगी न दिलेली दुकाने उघडी करता येणार नाहीत, ही दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून टप्प्या-टप्प्याने परवानगी देण्यात येणार आहे. एकाच वेळी या सहा शहरातील मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी प्रशासनाला करावे, असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version