Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात आणखी 60 जण कोरोना पॉझिटीव्ह


बीड : कोरोनाने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. कोरोनाची हीच साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनंगानेच जिल्ह्यात अँटीजेन टेस्टची मोहिम राबविली जात आहे. गुरूवारी अँटीजेन टेस्टच्या तिसर्‍या दिवशी परळी, माजलगाव, आष्टी, केज आणि अंबाजोगाई या शहरात 248 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर रात्री उशीरा आलेल्या रिर्पोटमध्ये 663 पैकी जिल्ह्यात आणखी 60 जण कोरोना बाधित सापडले आहेत. 603 जणांचे रिर्पोट निगेटीव्ह आले आहेत.बाधितांमध्ये बीड 16, परळी 2, माजलगाव 3, धारूर 4, केज 4, गेवराई 10, शिरूर 4, वडवणी 1आणि अंबाजोगाईतील 16 रूग्णांचा समावेश आहे. अँटीजेन टेस्टसह रात्री उशीरा आलेले असे एकूण गुरूवारी दिवसभरात 308 जण कोरोना बाधित आढळले आहेत.

Exit mobile version