आवरगावचे माजी सरपंच कांतराव आवरगावकर यांचे निधन
बीड
जिल्ह्याचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. रामराव आवरगावकर यांचे चिरंजीव, आवरगावचे माजी सरपंच कांतराव आवरगावकर यांचे छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होते, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे बीड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान राहिलेले आहे, ते धार्मिक व्रतीचे आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांच्या या निधनाने नातेवाईक आणि चहात्यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील सेंट्रल नाका एन-६ च्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले,
त्यांच्या पश्चात भाऊजई, दोन मुलं, दोन मुली, जावई पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे, आवरगावकर यांच्या दुःखात दैनिक लोकाशा, नखाते परिवार सहभागी आहे, सावडण्याचा कार्यक्रम सात डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
आवरगावचे माजी सरपंच कांतराव आवरगावकर यांचे निधन
