Site icon लोकाशा-बंब न्यूज

पोलिस अधीक्षक गेवराईत दाखल,गोंधळ घालणार्‍यांविरोधात तक्रार न मिळाल्यास पोलिस स्वत:हून गुन्हा दाखल करणार – नवनीत काँवत


गेवराई,
आज गेवराईत राडा झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे तात्काळ गेवराईत दाखल झाले. गोंधळ घालणार्‍यांविरोधात तक्रार न मिळाल्यास पोलिस स्वत:हून या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आज बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर नगर पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान गेवराईत राडा झाल्याची घटना समोर आली होती, गेवराईत पवार-पंडितांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी माजी आ. लक्ष्मण पवार, माजी सभापती युध्दजित पंडित आणि जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडितही एकमेकांसमोर आले होते. यावेळी एक चारचाकीही फोडली असल्याचे दिसून आले. यामुळे गेवराईतील वातावरण तणावपुर्ण झाले आहे. त्यामुळे गेवराईत पोलिसांची मोठी फौज  तैनात करण्यात आली आहे. तर आता स्वत: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हेही गेवराईत दाखल झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी कडक अ‍ॅक्शन घेतली आहे. गोंधळ घालणार्‍याविरोधात तक्रार न आल्यास याप्रकरणी पोलिस स्वत:हून गुन्हा दाखल करणार असल्याचे श्री. काँवत यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आता नेमका कोणा कोणावर गुन्हा दाखल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version