Site icon लोकाशा-बंब न्यूज

प्रधान सचिवांचा शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारींना दणका,शिक्षक भरती घोटाळा भोवला, दोघांनाही केले तडकाफडकी निलंबित,सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्या तक्रारीवर झाली मोठी कारवाई, लोकाशाचे वृत्त खरे ठरले

प्रधान सचिवांचा शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारींना दणका,
शिक्षक भरती घोटाळा भोवला, दोघांनाही केले तडकाफडकी निलंबित,
सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्या तक्रारीवर झाली मोठी कारवाई, लोकाशाचे वृत्त खरे ठरले

बीड्, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांनी बीड प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे, बोगस केलेली शिक्षक भरती यासह अन्य गोष्टी या दोघांनाही चांगल्याच भावल्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर सादिक इनामदार यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता, विशेष म्हणजे दैनिक लोकाशाने ही सातत्याने हे प्रकरण उचलून धरले होते, अखेर शिक्षक भरती घोटाळ्यात राज्य सरकारने मोठी करून घोटाळेबाजांना दणका दिला आहे राज्य सरकारने आज केलेल्या कारवाईमुळ जिल्ह्यातील घोटाळेबाज संस्थाचालक, घोटाळेबाज अधिकारी यांचे धाबे दणाणून गेले आहेत. या कारवाईबाबत दैनिक लोकाशा ने सातत्याने संकेत दिले होते अखेर ते संकेत आज खरे ठरले आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही, असे सांगत
इंजिनीयर सादिक इनामदार यांच्या लढाईला मोठा यश आले आहे.

Exit mobile version