Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओ दोन तास कोविड वार्डात


नागरीकांनो घाबरू नका आपली आरोग्य यंत्रणा दक्ष व सक्षम –
लोकाशा
जगभर कोरोनाचे संकट असताना त्या विरोधात लढण्याची देखील मोठी शर्थ शासन प्रशासन कडून केली जात आहे . बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कोविड वार्डातील रुग्णांना भेट दिली व त्यांची चौकशी केली . तब्बल दोन तास पीपी कीट मध्ये त्यांनी रुग्ण , डॉक्टर कर्मचारी यांच्याशी सवांद साधला . कोविड वार्डात जाऊन त्यांनी जिल्हा वासियांना विश्वास दिलेला आहे कि जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम व दक्ष आहे .
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि १९ रोजी सी ई ओ अजित जी कुंभार , डॉ अशोक थोरात व डॉ राठोड यांनी कोविड वार्डातील रुग्णांशी सवांद साधला . यावेळी त्यांनी वार्ड अंतर्गत स्वच्छता गृहाची पाहणी केली , रुग्णाकडून त्यांचे प्रश्न जाणून घेतले . या नंतर माध्यमांना बोलताना अजित कुंभार यांनी सांगितले कि रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे , जिल्हा आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असून डॉक्टर कर्मचारी यांचे प्रचंड कष्ट या ठिकाणी त्यांनी पाहितले आहेत . जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत आत जाऊन आणखी काय बदल करता येईल का यावर देखील आपण पाहणी केली . डॉक्टर पासून वार्ड बॉय पर्यंत सर्वांचे अभिनंदन केले . येथे व्हेंटीलेटर , ऑक्सिजन , व उपचार संदर्भात रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले . नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही , आमचे डॉक्टर व यंत्रणा पूर्णपणे सक्षम असल्याचे अजित कुंभार यांनी सांगितले . यावेळी डॉ .अशोक थोरात , डॉ सुखदेव राठोड , डॉ संजय राऊत डॉ अभिमान जाधव सोबत होते .

Exit mobile version