बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : आ. संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक श्रीमंत डावकर यांच्या मातोर्श्री मौज (ता.बीड) येथील ज्येष्ठ नागरिक साखरबाई बापूराव डावकर यांचे बुधवारी रात्री पावणे आकरा वाजता राहत्या घरी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते. त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी दहा वाजता मौज येथील स्मशानभुमित अंत्यविधी केला जाणार आहे. डावकर कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.
मौज येथील ज्येष्ठ नागरिक साखरबाई डावकर यांचे निधन, सकाळी दहा वाजता मौज येथे अंत्यविधी
