Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठा बांधव जिंकले, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने अखेर केल्या मान्य, हैदराबाद गॅझेटला मान्यता, तासात निघणार जीआर, तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो – मनोज जरांगे पाटील

मुंबई, मराठा आणि कुणबी एकच,त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, त्यासाठी हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करा,
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बांधवांच्या कुटुंबीयांना मदत करा या मागणीसाठी मुंबईतील
आझाद
मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते
उपोषणाच्या पाचव्या दिवशी
सरकार त्यांच्यापुढे
नमले
आहे त्या अनुषंगानेच सरकारने जरांगे पाटलांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केले आहेत हैदराबाद गॅजेटला मान्यता देण्यात आली आहे तसेच सातारा संस्थांच्या गॅझेट मधील त्रुटी दूर करून तेही लागू करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे तसेच मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर अखेर पर्यंत मागे घेणार तसेच बलिदान देणाऱ्या बांधवांच्या कुटुंबीयांना आठवड्यात मदत देणार या सर्व गोष्टी सरकारने मान्य केले आहेत यावरूनच जरांगे पाटलांच्या लढायला यश आले असून मराठा बांधव जिंकले असल्याचे पाहायला मिळत आहे

Exit mobile version