Site icon लोकाशा-बंब न्यूज

सरकारी वकील चंदेल यांच्या आत्महत्या प्रकरणी जज रफिक शेख आणि लिपिक तायडे यांच्यावर गुन्हा दाखल


वडवणी येथील न्यायालयाच्या परिसरातील एका रूममध्ये सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, आत्महत्या पूर्वी त्यांनी आपल्या खिशात एक चिठ्ठी
लिहून ठेवली होती, मी जज रफिक शेख आणि क्लार्क तायडे या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे तसेच या प्रकरणी विश्वजीत विनायक चंदेल यांनीही आपली तक्रार दाखल केली आहे त्यानुसार वडवणी पोलीस ठाण्यात जज रफिक शेख आणि क्लार्क तारडे या दोघांवर वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्वतः आयजी वीरेंद्र मिश्र आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी दिले होते त्यानुसार वडवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

माझ्या वडिलांनी वडवणी न्यायालयाचे न्यायाधिश शेख रफीक व कारकुन तायडे यांच्या अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या गुन्याची सखोल चौकशी व्हावी, वडिलांना व आम्हा कुटूंबीयांना मिळावा – विश्वजित चंदेल , मयताचा मुलगा .

Exit mobile version