Site icon लोकाशा-बंब न्यूज

लिपिक आणि शिक्षक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी, लिपिकाने पुन्हा नातेवाईक बोलावून शिक्षकाला केली बेदम मारहाण, मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद, धारूर शहरातील सरस्वती शाळातील प्रकार

येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयांमध्ये दि.०१ ऑगस्ट रोजी सकाळच्या
११-३० वाजण्याच्या सुमारास पाणी अंगावर टाकले म्हणून सरस्वती शाळातील शिक्षक विजय सुधाकर काळे व लिपिक प्रदीप भारत शेटे यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली त्यानंतर लिपिक विजय शेटे यांनी आपल्या नातेवाईकाला फोन करून शाळात बोलावून शिक्षक विजय काळे यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मात्र या प्रकरणी मुख्याध्यापक श्री डोंगरे यांनी शिक्षण विभागाला किंवा पोलिसांना कसल्याही प्रकारची कळवले नसल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात येत आहे का असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत असताना सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.०२ ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाला माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुख सय्यद हकीम यांनी सरस्वती विद्यालयाला भेट दिली असून मुख्याध्यापक श्री डोंगरे यांना जो काही प्रकार घडलेला आहे त्याची रीतसर माहिती शिक्षण विभागाला कळवण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच शिक्षक विजय काळे यांना पोलिसात फिर्याद देऊ नको म्हणून दबाव आणण्यात येत असल्याचेही समजत आहे त्यामुळे अशा प्रकरणाला जर का पाठीशी घातले तर नक्कीच नक्कीच सरस्वती विद्यालयामध्ये भविष्यामध्ये काही अनुसूचित प्रकार घडू शकतात यात कसलीही शंका नाही त्यामुळे विद्यार्थ्यांवर अचूक आणि चांगले संस्कार टाकायचे असतील तर अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version