Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडच्या एएचटीयु कक्षाने पुणे शहरातून अल्पवयीन पीडितेची सुटका करुन आरोपीला ठोकल्या बेड्या, PSI पल्लवी जाधव व त्यांच्या टीमची कारवाई

पोस्टे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२५ कलम १३७(२), १४३(२) BNS हा दिनांक ०५/०२/२०२५ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा हा ०२/०७/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाला. सदर गुन्ह्याच्या मूळ फाईलचे, तपास अधिकारी PSI पल्लवी जाधव यांनी बारकाईने अवलोकन केले . त्यानंतर पीडित मुलीच्या आईची व भावाची त्यांच्या राहत्या घरी जावून भेट घेतली व त्यांच्याकडून गुन्ह्या संबंधाने माहिती मिळवली. सदर माहितीच्या आधारे तांत्रीक पद्धतीने कौशल्यपूर्ण तपास करुन पीडित मुलगी व आरोपी यांचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले. त्यावरून दिनांक १९/०७/२०२५ रोजी सकाळी AHTU ची टीम ही मा. एसपी सर यांच्या आदेशाने पुणे साठी रवाना झाली. पुणे शहरात लक्ष्मीनगर , वाल्हेकरवाडी येथील एका अपार्टमेंट च्या फ्लॅट मधे चिंचवड पोलीस ठाणेच्या हद्दीत पीडित मुलगी ही आरोपीच्या ताब्यात मिळून आली. सदर पीडीतेला व आरोपीला ताब्यात घेवून AHTU ची टीम बीड ला आली व त्यांना पुढील तपासकामी पोस्टे शिवाजीनगर येथे हजर केले.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई प्रदीप वीर व योगेश निर्धार सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

Exit mobile version