Site icon लोकाशा-बंब न्यूज

पहाटेच अवैध वाळू माफियांना एलसीबीचा दणका, गोदावरी नदीपात्रात छापेमारी करून 23 लाखाचा मुद्देमाल जप्त

पहाटेच अवैध वाळू माफियांना एलसीबीचा दणका, गोदावरी नदीपात्रात छापेमारी करून 23 लाखाचा मुद्देमाल जप्त केला

बीड,
आज दि २३/७/२५ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गेवराई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू चोरटी उपसा ट्रॅक्टर व केणी च्या साह्याने करीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने जाऊन रेड केली असता अंधाराचा फायदा घेऊन तेथील इसम पळून गेले त्यामध्ये एक जागीच पकडला. एकूण चार ट्रॅक्टर व केन्या ताब्यातील आरोपीकडून जप्त केल्या. असा एकूण 23,00,000/-( तेवीस लाख रुपये )किमतीचा मुद्दाम तपासणी जप्त करून चार आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व एक आरोपी मुद्देमाल सह पोलीस स्टेशन येथे हजर केला आहे. सदरची कार्यवाही पोउपनि/सिध्देश्वर मुरकुटे
व टीम यांनी केलेली आहे.

Exit mobile version