बीड माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी पदी प्रियाराणी पाटील यांची नियुक्ती
बीड ।
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी संभाजीनगरहून प्रियाराणी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांमधील झालेल्या नौकर भरती घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी
नागनाथ शिंदे (मा.) यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहीला असून त्यांची शासनाने बदली केल्यानंतर काही काळ हे पद रिक्त राहिले होते. जिल्ह्यात शिक्षण संस्थांच्या नौकर भरतीमध्ये झालेला घोटाळा शिंदे यांना भोवला असून त्यात त्यांची बदली झाली. आता त्यांच्या जागी संभाजीनगरहून विभागीय मंडळातील सहसचिव प्रियाराणी पाटील यांची झेडपीच्या शिक्षणाधिकारी (मा.) पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पदभार घेतल्यावर नौकर भरतीमधील घोटाळेबाजांवर कारवाई करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
