बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : सीईओ जितीन रहमान हे बीड जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी बीड झेडपीचा पदभार घेतला आहे. यावेळी त्यांचे बीड झेडपीचे अतिरिक्त सीईओ वासूदेव सोळंके यांनी स्वागत केले.
सीईओ आदित्य जीवने यांची बीड झेडपीतून नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुरूंगानथम एम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते रूजू झाले नाहीत, त्यामुळे आता त्यांची नियुक्ती रद्द करून बीड झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जितीन रहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यानुसार ते आज दि. 19 जून रोजी बीडमध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी सीईओ जितीन रहमान यांचे झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके यांनी स्वागत केले.
सीईओ जितीन रहमान यांनीबीड झेडपीचा पदभार घेतला
