Site icon लोकाशा-बंब न्यूज

जितीन रहमान बीड झेडपीचे नवे सीईओ

जितीन रहमान बीड झेडपीचे नवे सीईओ
बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : सीईओ आदित्य जीवने यांची बीड झेडपीतून नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुरूंगानथम एम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते रूजू झाले नाहीत, त्यामुळे आता त्यांची नियुक्ती रद्द करून बीड झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जितीन रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून ते सध्या कर्तव्य बजावत होते. आता त्यांच्याकडे बीड झेडपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Exit mobile version