Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपी सीईओंचा अतिरिक्त पदभार वासूदेव सोळंकेंकडे, नवे सीईओ येईपर्यंत संभाळणार जि.प.ची चोखपणे जबाबदारी


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : येथील झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार एसीईओ वासूदेव सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नवे सीईओ येईपर्यत श्री. सोळंके हे बीड जिल्हा परिषदेची जबाबदारी अगदी चोखपणे संभाळणार आहेत.
मागच्या दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बीड झेडपीचे सीईओ आदित्य जीवने यांची छ. संभाजीनगर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या जागी बीड सीईओ म्हणून मुरूगानंथम एम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र ते रूजू होतात की नाही अशी चर्चा सध्या जिल्ह्यातून ऐकायला मिळत आहे. तर शासनाने आपली बदली झाल्यानंतर आदित्य जीवने हे बीड झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार एसीईओ वासूदेव सोळंके यांच्याकडे सोपवून ते बीडमधून रिलीव्ह झालेले आहेत. त्यामुळे नवे सीईओ येईपर्यंत श्री. सोळंके हे बीड झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी अगदी चोखपणे संभाळणार आहेत. 

Exit mobile version