बीड, दि. 26 (जि.मा.का.) पोलीस अधीक्षक बीड यांनी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी महालक्ष्मी कला केंद्र सावंतवाडी (उमरी) तालुका केजबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासअहवाल सादर केला असून सदरील अहवालामध्ये त्यांनी महालक्ष्मी कला केंद्र सावंतवाडी (उमरी) तालुका केज या ठिकाणी बाहेरील जिल्ह्यातून महिला आणून आरोपी हे वेश्या व्यवसाय करून घेत असे तपासात निष्पन्न झालेले आहे.
तसेच यापूर्वी सदरील लोकनाट्य कला केंद्र चालक यांच्यावर दिनांक 7.7. 2023 रोजी पोलीस ठाणे केज येथे गुरनं 188, 109, 114, 290,34,370 (4) (5), 370 (अ) 373, 376 (फ) (आय) भादवी सह कलम च4,6, 17, 18, 21 बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम सह कलम 3,4,5,6,8,92015 सह कलम 3 (2) (V) अजाज अप्रका सह कलम 65 (ई) मु.आ.का. प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरठिकाणी पुन्हा अशा स्वरुपाचा गुन्हा घडू नये पिडीत महिलांचे शोषण होऊ नये म्हणून त्यावर कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.
सदर गुन्याचे घटनास्थळ महालक्ष्मी कला केंद्र, सर्वे नंबर 160, सावंतवाडी (उमरी) ता. केज यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊन सदरचे कला केंद्र सिल होण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी सदरील प्रकरणास सुनावणी घेऊन सुनावणी अंति सदरील महालक्ष्मी कला केंद्र सावंतवाडी (उमरी) तालुका केज यांना देण्यात आलेल्या लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश पारित केलेले आहे असे जिल्हाधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.