Site icon लोकाशा-बंब न्यूज

नेकनूर परिसरात गोळीबार, एक ठार

नेकनूर दि.२३(वार्ताहर): नेकनूर (Beed)पोलीस ठाणे हद्दीत महाजनवाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी गार्डने (दि.२२)गुरुवार रोजी रात्री केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस(Crime) सूत्रांनी दिली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकृत माहिती लवकरच हाती येईल.

     बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात चोरटयांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला त्यावेळी सिक्युरिटी गार्ड असलेल्या व्यक्तीने या लोकांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एकाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Exit mobile version