Site icon लोकाशा-बंब न्यूज

नवलकिशोर राम यांची पुन्हा महाराष्ट्रात एन्ट्री, राम आता पुण्याच्या महानगर पालिकेचे नवे आयुक्त तर आनंद भंडारी आहिल्यानगर झेडपीचे सीईओ


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याचे तात्कालिन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुन्हा एखदा महाराष्ट्रात एन्ट्री होणार आहे. कारण राम यांच्याकडे आता पुण्याच्या महानगर पालिकेचे आयुक्त पद सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर बीड झेडपीचे तात्कालिन एसीईओ आनंद भंडारी हे आहिल्यानगर झेडपीचे नवे सीईओ असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत.
नवलकिशोर राम यांनी बीड जिल्ह्यात जवळपास साडे तीन वर्षांहून अधिक काळ जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविलेले आहेत. त्यामुळेच बीड जिल्हा त्यांची सेवा कधीच विसरू शकत नाही, बीडनंतर छ. संभाजीनगर आणि पुणे याठिकाणीही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून चोखपणे कर्तव्य बजावलेले आहे. पुढे पुणे येथून त्यांची दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचे सहसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. याही ठिकाणी त्यांनी आपल्या कामातून कर्तव्यदक्षपणा दाखवून दिला आहे. आता पुन्हा एखदा त्यांची महाराष्ट्रात एन्ट्री होत आहे. कारण सरकारने त्यांच्याकडे आता पुणे महानगर पालिकेचे आयुक्त पद सोपविले आहे. यासंदर्भात बुधवारी आदेश काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर बीड झेडपीचे तात्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची नगर झेडपीच्या सीईओ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या दोन्हीही अधिकार्‍यांनी बीडमध्ये अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करून नागरिकांचे प्रश्न सोडविले होते, अगदी याच प्रमाणे या नव्या ठिकाणीही ते दोघेही चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा विश्वास सर्वांना आहे.

Exit mobile version