मुंबई, दि. 19 (लोकाशा न्यूज) : ओबीसी नेते छगन भुजबळांची पुन्हा एखदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. उद्या दि. 20 मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांचा राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. विशेष म्हणजे धनजंय मुंडे यांच्या जे खाते होते ते अन्न व पुरवठा खाते आता भुजबळांकडे जाणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर मोककाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना खर्या अर्थाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यापासून त्यांच्याकडील अन्न व पुरवठा खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे ठेवले होते. आता मात्र छगन भुजबळ पुन्हा एखदा मंत्रीमंडळात येत असून त्यांचा उद्या दि. 20 मे रोजी सकाळी दहा वाजता मुंबईतील राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. पुन्हा एखदा त्यांच्याकडे अन्न व पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान भुजबळांच्या या प्रवेशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ पुन्हा होणार मंत्री, उद्या राजभवनात शपथविधी, अन्न व पुरवठा खाते जाणार भुजबळांकडे
