सिरसाळा : पुतण्याने वयोवृद्ध चुलतीचा खून केल्याची घटना परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे दुपारी ३ : ३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. परीमळा भागूराम कावळे वय ६५ असे मयत महिलेचे नाव आहे.
माहिती मिळताच घटना स्थळी सिरसाळा पोलीस नुकतेच दाखल झाले आहेत. चंद्रकांत कावळे वय ४५ असे पुतण्याचे नाव आहे. राहत्या घरी खून केल्याची घटना घडली आहे.
खुनाचे कारण समजले नाही.
पुतण्याने चुलतीचा केला खून, परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथील घटना
