बीड : सध्या लॉकडाऊन असलेल्या परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज आणि आष्टी या शहरातील व्यापार्यांची 18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी (ता.18 ऑगस्ट) या पाचीही शहरामध्ये तब्बल 210 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 37, आष्टी 17, केज 19, माजलगाव 71 आणि परळीमधील 66 जणांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी ‘त्या’ पाच शहरात अँटीजेन टेस्टमध्ये सापडले 210 जण कोरोना पॉझिटीव्ह
