Site icon लोकाशा-बंब न्यूज

राहूल दुबालेंसाठी मुख्यमंत्री जुन महिण्यांत बीडमध्ये, पोलिस परिवार अस्तित्व मेळावा होणार


बीड, दि.20 (लोकाशा न्यूज) : काल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत पोलिस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहूल दुबाले यांनी चर्चा केली, त्यानुसार येत्या जून महिन्यात बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस परिवार अस्तित्व मेळावा संपन्न होणार आहे. दुबालेंसाठी फडणवीस बीडमध्ये येणार असून या कार्यक्रमाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शनिवारी नारळी सप्ताहासाठी घाटशीळ पारगाव येथे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, राज्याच्या पोलिस परिवाराच्या पाठीशी खंबीर उभा असणारा पालकत्व असणारे मुख्यमंत्री पोलिसांच्या अनेक प्रश्नांसाठी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती केली की पोलीस परिवार अस्तित्व मेळावा घ्यायचा आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ म्हणजे पोलिसांच्या अडचणी सोडवण्यासाठी जून महिन्यामध्ये बीड येथे मी येतो, असे सांगितले. येत्या जून महिन्यामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अंतर्गत महाराष्ट्र पोलीस परिवार अस्तित्व मिळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, जेल पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ पोलीस, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस क्लॅरिकल संघटना, महाराष्ट्र पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा संघटना, पोलीस भरती करणारे तमाम युवक, महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार युवक आणि अनेक सामाजिक संघटना मिळून बीड येथे भव्य दिव्य असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पोलीस परिवार अस्तित्व मेळावा संपन्न होणार आहे, याची तारीख लवकरच कळवली जाईल, या मेळाव्यात पोलीस अधिकारी कर्मचारी यांना भेडसावणार्‍या मोफत आरोग्य सुविधा आणि हक्काचे घर अनेक प्रश्न सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मोफत आरोग्य सुविधा पोलीस पाल्य आरक्षण, अनुकंप तीन अपत्य, एस आर पी एफ पोलीस यांची जिल्हा बदली, जेल पोलीस पाल्यांना आरक्षण व जेल पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना महाराष्ट्र पोलिसांप्रमाणे अधिकार, होमगार्ड सैनिकांना 365 दिवस रोजगार, पोलीस भरती करणार्‍या युवकांसाठी दरवर्षी पोलीस भरती काढणे, प्रलंबित असणारे पोलिसांचं डीजे लोन गृह अग्रीम लोन मंजूर करून दरवर्षी यादी निघावी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार, वय निघून गेलेल्या पोलीस पाल्यांना सामान्य युवकांना शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, पोलीस खात्या अंतर्गत असणारे क्लर्क संघटना यांचे विविध प्रश्न अशा अनेक प्रश्नांची साकडे मुख्यमंत्र्यांकडे मांडून शासकीय निमशासकीय अनेक संघटनेचे प्रश्न या अस्तित्व मेळाव्या मधून मांडून हे मुख्यमंत्र्यांकडून मान्य करून घ्यायचे आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी व आपापल्या तालुक्यात शहरात जिल्ह्यात राज्यात बैठका घेऊन हा अस्तित्व मिळावा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून पोलीस परिवार घेतोय या हिशोबाने कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिस बाँईज संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समितीचे सदस्य राहूल दुबाले यांनी केले आहे.

Exit mobile version