Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथे तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, आरोपीस अटक


प्रतिनिधी ।धारूर
तालुक्यातील कोळपिंपरी येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर गावातील शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरी दोन वेळा अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली .याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
धारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी धारूर येथील एका शाळेतुन सुट्टीवर घरी आजोबाकडे गेली होती .आई -वडील पुण्याला ड्रायव्हिंग व्यवसायाच्या निमित्ताने राहत असल्यामुळे ती आपल्या लहान मुलीसह शिक्षण घेत आजोबाकडे राहत होती . कोळपिंपरी येथील घराशेजारी पवन भारत यादव याने तिला एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचे तोंड दाबुन बळजबरीने त्याचे घरी घेऊन जावुन जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी उघडकीस आली .तिच्यावर १५ जानेवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास व ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरी अत्याचार केला .तसेच आरोपीने त्या पीडित मुलीला कोणाला सांगीतले तर तुझे आजी आजोबा व तुला जिवंत मारुन टाकीन अशी धमकी दिली होती.मुलगी धारूर येथे शाळेत आल्यानंतर दोन दिवसापूर्वी तिने आपल्या मैत्रिणीच्या दूरध्वनीवरून आई-वडील पुण्यात राहत असल्याने आईस पोटात दुखत असल्याची माहिती दिली .यावरून तिला धारूर येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले .यावेळी सदरील घटना मुलीने डॉक्टरांना सांगितल्यानंतर अत्याचार झाल्याचा प्रकार आजोबा आणि चुलत्यास माहीत झाला . याची माहिती तिचा चुलता व आजोबा तसेच पिडीत हे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरुन नरधाम आरोपी पवन भारत यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

Exit mobile version