बीड: बीड (Beed)जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा, कामे दर्जेदार करा हे सांगतानाच बीड जिल्ह्याची बदनामी करु नका या शब्दात उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री (Ajit pawar)अजित पवार यांनी बीडमधील सर्वांनाच सुनावले आहे. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. बीड जिल्ह्यातील विमानतळाबाबतही पालकमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. बीडमध्ये छोटे विमान उतरण्यासाठी लांब धावपट्टी करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
जिल्ह्याची बदनामी करु नका, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा – पालकमंत्री अजित पवार, बीडमध्ये छोटे विमान उतरण्यासाठी लांब धावपट्टी करण्याबाबत पालकमंत्र्यांनी दाखवली सकारात्मकता
