Site icon लोकाशा-बंब न्यूज

बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक, आठवले गँगचा सहभाग निश्चित, बीड शहर पोलिसांची कामगीरी

*बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक ..
आठवले गँगचा सहभाग निश्चित.
बीड शहर पोलिसांची कामगीरी.
आठवले गॅंग सोबत सावलीसारखा राहणारा मनीष क्षिरसागर यांच्या घरामध्ये तीन महिन्यापूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना मिळून आला होता. यामध्ये बीड शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत यातील प्रिंटर, बनावट चलनी नोटा, आणि सहभागी प्रमुख आरोपी तात्काळ अटक केली होते. परंतु यातील प्रमुख आरोपी मनिष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता. परंतु बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून उचलले.
परंतु पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हे सुद्धा सोबत मिळून आले होते. तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासा संदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यात सुरुवात केली होती.
यावरून आयत्या तावडीत सापडलेल्या मणिष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून त्यांचा ताबा घेतला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली. अक्षय आठवले यांनी बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रविण गायकवाड यास पिस्टल पुरवले होते. तसेच पळून जाताना मनीष क्षीरसागर याला सोबत घेऊन जाऊन औरंगाबाद येथे लपवले होते. तसेच सनी आठवले यांनी सुद्धा यातील आरोपींना शरण देऊन अक्षय आठवले मार्फत संरक्षण पुरवले होते. या काका पोलिसांना गुन्ह्यात वापरलेला मनीष क्षीरसागर याचा मोबाईल मिळाला आहे. या माध्यमातून आणखी पुरावे या गॅंगच्या विरुद्ध पोलिसांना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक श्री नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंबर गोलड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ , सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, मनोज परजणे, सुषेंन पवार, सचिन अलगट, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Exit mobile version