Site icon लोकाशा-बंब न्यूज

ना. पंकजाताई मुंडे श्रीक्षेत्र माहूरगडावर ; रेणुकामातेचे घेतले दर्शन,जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत

नांदेड। दि. २०।
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना.
पंकजाताई मुंडे यांचं आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच माहूरला आगमन झालं. देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन त्यांनी रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी त्यांचं शहरात जोरदार स्वागत केलं.

नागपूर येथील शासकीय कार्यक्रम आटोपल्यावर ना. पंकजाताई मुंडे यांचं दुपारी श्रीक्षेत्र माहूरला आगमन झाले. शहरात येताच आमदार भीमराव केराम, भाजप नेते देविदास राठोड तसेच कार्यकर्त्यांनी त्यांचं जेसीबीतून फुलांची उधळण करत वाजतगाजत जंगी स्वागत केलं माहूरगडावरील श्री रेणुकामातेचे त्यांनी दर्शन घेऊन देवीला साडी अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं.

Exit mobile version