Site icon लोकाशा-बंब न्यूज

सेवानिवृत्त शिक्षकाकडून 90 हजार रुपये घेतांना माध्यमिकच्या वरिष्ठ लिपिकास पकडले


बीड ः सेवानिवृत्त शिक्षकाच्या कामासाठी 90 हजाराच्या लाचेप्रकरणी माध्यमिक शिक्षक विभागाच्या वरिष्ठ लिपिकास (कुडके) बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. सदर लाचखोराने यापुर्वी लाचेचे चाळीस हजार रुपये स्विकारले असून पन्नास हजार रुपये घेतांना आज माध्यमिक शिक्षण विभागात पकडले आहे.
डीवाएसपी शंकर शिंदे यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागातील लाचखोराचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईमध्ये शिक्षण विभागातील मोठे अधिकारी गळाला लागण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

Exit mobile version