Site icon लोकाशा-बंब न्यूज

वाल्मिक कराडच्या पत्नीची CID चौकशी, 2 बॉडीगार्ड आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचीदेखील कसून चौकशी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सीआयडी चांगलीच कामाला लागली आहे. सीआयडीकडून या प्रकरणातील फरार संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली आहे. यासोबतच सीआयडीकडून वाल्मिक कराड यांचे दोन अंगरक्षक आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची चौकशी सुरु आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या घटनेतील संशयित फरार आरोपी वाल्मिक कराड यांचा सीआयडी आणि पोलिसांकडून शोध सुरु आहे. पण वाल्मिक कराड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यानंतर आता सीआयडी चांगल्याच अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीआयडीने आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वकर चव्हाण यांची देखील सीयआडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सीआयडीने मंजिली कराड यांना चौकशीनंतर सोडून दिलं आहे. पण सध्या कराड यांचे अंगरक्षक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस झाले आहेत. पण अद्यापही या प्रकरणातील 3 आरोपी हे फरार आहेत. पोलीस, सीआयडीचे पथक अपार परिश्रम घेत आहेत, पण तरीही आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. सीआयडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे देखील बीड शहर पोलीस ठाण्यात आज आले होते. यावेळी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची जवळपास 40 मिनिटे चौकशी झाली आहे. त्यानंतर राजेश्वर चव्हाण आणि कराड यांच्या दोन अंगरक्षकांची चौकशी घेणं सुरु आहे. राजेश्वर आणि अंगरक्षक हे वाल्मिक कराड यांच्या संपर्कात आहेत का, त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? याबाबतची माहिती सीआयडीकडून घेतली जात आहे.

Exit mobile version