Site icon लोकाशा-बंब न्यूज

ना. पंकजाताई मुंडे यांचे पाच वर्षांनंतर मंत्रालयात आगमन, मंत्रालयातील दालनात आजपासून सुरू केले कामकाज

मुंबई, दि. २७ – पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात पाच वर्षानंतर आगमन झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने अत्यंत साधेपणाने मंत्री श्रीमती मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली.

यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांनी प्रथम गणेशाची पुजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
••••

Exit mobile version