Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता वाल्मिक कराडांचा खंडणीचा गुन्हाही सीआयडीकडे वर्ग, पवनचक्की कार्यालयाच्या परिसरातील मारहाणीच्या गुन्ह्याचाही तपास सीआयडीच करणार


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. आता वाल्मिक कराडांचा खंडणीचा गुन्हाही सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पवनचक्की कार्यालयाच्या परिसरातील मारहाणीच्या गुन्ह्याचाही तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. त्यानुसार या तिन्ही गुन्ह्यातून सीआयडी नेमके काय काय बाहेर आणणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सध्या सीआयडी गतीने करत आहे. या गुन्ह्याच्या आधी दि. 6 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी शिवाजी नाना थोपटे, प्रोजेक्ट सिनीयर मॅनेजर, अवादा एनर्जी (पवनचक्की) ह.मु. कळंबरोड केज यांनी पो.स्टे. केज येथे आरोपी 1) अशोक नारायण घुले, 2) सुदर्शन घुले, 3) प्रतिक घुले व इतर एक (सर्व रा. टाकळी, ता. केज) यांचेविरुद्ध पोलीस ठाणे केज गुरनं. 636/2024 भारतीय न्याय संहिता कलम 115 (1), 118 (1), 3(5), 333, 359 (2) (3) 352 अन्वये गुन्हा नोंद केला होता. तसेच दि. 11 डिसेंबर 2024 रोजी सुनिल केंद्र शिंदे, प्रकल्प अधिकारी, अवादा अवादा एजर्जी (पवनचक्की), केज तालुका, रा. मोंढा रोड बीड यांनी पो.स्टे. केज येथे आरोपी नामे वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचेविरुद्ध पोलीस ठाणे केज गुरनं. 638/2024 भारतीय न्यायसंहिता कलम 3(5), 308(2) (3) (4) (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. वर नमुद गुरनं. 636/2024 तसेच 638/2024 या गुन्हयांचा तपास गुन्हे अन्वेषन विभाग, बीड यांचेकडे तात्काळ वर्ग करण्याबाबत मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश प्राप्त झाल्याने सदरचे दोन्ही गुन्हे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी राज्य गुन्हे अन्वेषन विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.
000

Exit mobile version