बीड,
मागच्या चार दिवसांपूर्वी गोळीबार करून
कुख्यात आठवले गँगने पेठ बीडमधील एकाला जखमी केले होते, जुन्या वादातून ही घटना घडली होती, याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता तसेच पहिल्या दिवशी एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या, आता याच गुन्ह्यातील अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई या तिघांना पुण्यातील लोहगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे, सदर आरोपी हल्ला करू शकतात याची माहिती पोलिसांना होती, त्यामुळे पोलिसांनी पावलोपावली काळजी घेत त्यांना सिनेस्टाईलने पकडले.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून आरोपींना रात्री बीडला आणण्यात आले आहे.
बीडच्या गोळीबारमधील तीन आरोपींच्या हातात बेड्या, पुण्यातील लोहगाव परिसरातून अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओमकार सवाई यांना केली अटक, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीड एलसीबीची मोठी कारवाई
